Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gautam Jagtap

Inspirational

4.7  

Gautam Jagtap

Inspirational

ज्ञानज्योती सावित्री आई

ज्ञानज्योती सावित्री आई

2 mins
23.2K


आई माझी आई माझी सावित्री आई!

मुलामुलींना शिक्षण भेटले! आज तुझ्या पायी

रूप तुझे हे सरस्वतीचे! विद्येची तूच माई

शिक्षणाचा प्रसार करूनी! समाज जागृत होई

अज्ञानातून ज्ञान प्रकटले! आज तुझ्या पायी

"क्रांतीज्योती" तू सावित्रीआई! "ज्ञानज्योत" तू पेटवत राही

आई माझी आई माझी सावित्री आई!(१)


अन्यायाची लाट पसरली! शिक्षणाची तुम्ही वाट शोधली

न्याय मिळवला विद्येसाठी! खडतर तुमचा प्रवास होई

विद्येसाठी उपाशीपोटी! जुलूम आत्याचार सहन करती

अशी खडतर तपस्या तुमची होती! सदा तुम्ही आनंदात राहती

लोकांना तुम्ही ज्ञानार्जन करतीहे! ज्ञानज्योत प्रकाशमय होई

शिक्षणाला तुम्ही जन्म दिला! ज्ञानज्योत प्रकाशमय होई

आई माझी आई माझी सावित्री आई!(२)


ज्ञानज्योती तू प्रकट केले! शूद्रातिशूद्र तुम्ही पुढे नेले

समाजाचे तुम्ही डोळे उघडले! अंधारातून प्रकाशमय केले 

झुंज दिली तुम्ही शिक्षणासाठी! स्त्रियांचे तुम्ही उभ्या राहिल्या पाठी

आज प्रगती तुझ्याच पायी! शिक्षणासाठी सदा लढतच राही

थोर अशी सावित्रीआई! स्त्रियांना तुम्ही बळ देई

आई माझी आई माझी सावित्री आई!(३)


सावित्रीआई सांगे जगाला! मुला-मुलींनो शिका सारे

अज्ञानाला मुक्त करा रे! ज्ञानाला तुम्ही प्राप्त करा रे

मोठ्यांचा तुम्ही मान राखा रे! शिस्त सुंदर जीवन जगा रे

समाजासाठी प्रगती करा रे! शून्यातून विश्व निर्माण होई

आयुष्याची तू प्रज्ञा करुणाई!

धन्य धन्य सावित्री आई

आई माझी आई माझी सावित्री आई!(४)


निरक्षरातून साक्षर झाले! आदर्श व्यक्ती तुम्ही घडवले

कार्य तुम्ही असे महान केले! जीवन असे सोयीस्कर झाले

असीम तुमची देशभक्ती! परखड ही कल्पनाशक्ती

सदा तुम्ही हिंमत ठेवा! समाज शक्ती ही महान सेवा

विचार तुमचे शुद्ध वाणी! शिका सारे संघटित होऊनी

आई माझी आई माझी सावित्री आई!(५)


साधीसुधी राहणी होती! स्वार्थ पोटी कधी लोभी नव्हती

स्वच्छ सुंदर सदा राहती! गरीबीची कधी लाज नव्हती

गोरगरिबांचे तुम्ही मदत करती! स्वतः तुम्ही दिवा बनून राहती

समाजसेवा काम तुमचे! पहिली शिक्षिका पद होते

मुला मुलींना शिकवत होती! हर्ष आनंद देत राहती

दीन-दलितांच्या मुला-मुलींना! मातेसारखी वागणूक देई

आई माझी आई माझी सावित्री आई!(६)


नाही कुणाचा भेद मानती! सर्वांमध्ये मिसळून राहती

असे थोर संस्कार तुमचे! समाजाला तुम्ही देत राहती

अशी तुमची आठवण होती! हृदयामध्ये बसली होती

बाप ज्योतिबा माता सावित्री! शिक्षणाचे ते जनक होते

रात्रंदिवस जागत होते! अखंड दीप तेवत होते

उठा सारे जागे व्हा रे! समाज एकी निर्माण करा रे

विश्वाला हा संदेश आमचा! एक मताचे आम्ही सहारे

मातेसारखे प्रेम तुमचे! समाजाला तुम्ही आठवत राही

काळ असा हा आला होता! पंचतत्वात ज्योती विलीन होई

आई माझी आई माझी सावित्री आई!(७)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational