STORYMIRROR

somadatta kulkarni

Inspirational

3  

somadatta kulkarni

Inspirational

ज्ञानेश्वर माऊली

ज्ञानेश्वर माऊली

1 min
227

विष्णू अवतार | माझा ज्ञानेश्वर

आहे खरोखर | ज्ञानराज   ॥१॥


गीतेवर टीका | ज्ञानेश्वरी ख्यात

कर्मयोग ज्यात |सांगीतला  ॥२॥


सातशे श्लोकांची|भावार्थ दिपीका

मार्ग जी साधका |दावितसे  ॥३॥


गीता सार ज्ञान | पाजीले सर्वांना

ज्ञान मुढजना  |चोजविले   ॥४॥


कर्मठ ब्राह्मण | छळती माऊली

कृपेची साऊली|ज्ञानेश्वर   ॥५॥


पसायदान जे | माऊलीचे वाण

विश्वाचे कल्याण |एक असे   ॥६॥


ज्ञानियांचा राजा|निव्रुत्तींचा शिष्य

गीतेवर भाष्य | करीतसे   ॥७॥


विश्वाची माऊली| खरोखर शोभे

कृपा मज लाभे |दास म्हणे   ॥८॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational