जन्मदाती
जन्मदाती
जन्मदाती आईची माया
खूप काही सांगून जाते
चंचलता तुझे नाव स्त्री
या दोषारोपास मिटवते......१
ऐकलयं इतिहासी पानी
स्त्री म्हणे चंचल स्वभावाची
संयमाने संसार करणारी रमाई
दिशा बदलवते काही विचारांची.......२
सहनशील होऊन चालली
सावित्रीमाई शाळेच्या वाटी
तिच्या स्थिरतेच्या गुणानेचं
आज स्त्री कर्तृत्वाची दाटी........३
करारी बाणा जिजाऊचा
स्वराज्याचा नायक देतसे
कितीतरी वादळवाटांना
तिचा निश्चय हरवत असे......४
चंचलता तुझे नाव स्त्री
अजूनही असेच म्हणाल का?
एक व्यक्ती म्हणून ती जगणारी
सदुषणे लावणे तिला थांबवाल का?.........५
तूच आहे तुझ्या रे
जीवनाचा शिल्पकार
मानवा,स्त्रीवर्गाने दिलाय
स्वबळावर जीवना आकार.........६
