जलपरी बालकविता
जलपरी बालकविता
माझी जलपरी
पावसात भिजण्याची
पूरी करु आज हौस
सरीवर सरी येती
आला रे मोठा पाऊस
फाडा वहीची ती पाने
करु कागदाच्या होड्या
सोडू पाण्यात तयांना
मस्ती करु ,थोड्या खोड्या
पुढे गेली पहा कशी वेगात
नाही तिला अडवू शके वारा
माझी होडी चाले डौलात
पडता कितीही वर्षा धारा
बनवली होती तिला मीच
घेऊन कागद तो सुंदर
तरंगत आली जलाशयात
सर्व होड्यांच्या अगोदर
नाव मी दिले तिला
माझ्या आवडीचे जलपरी
आहे ना खरोखर पहा
नावा प्रमाणे जल सुंदरी
कसे केले मनोरंजन
छोट्याश्या मम होडीने
या एकदा तुम्ही पण
सफर करवीन सवडीने
