STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Inspirational

3  

Sheshrao Yelekar

Inspirational

जल्लोष भारत मातेचा

जल्लोष भारत मातेचा

1 min
241

शूरवीर लढवय्या

हुंकार तो क्रांतीचा

पारतंत्र्याची बेडी तुटली

जल्लोष भारत मातेचा


एका हून एक सरस

मनी भावना सेवेची

प्राणाहून ही श्रेष्ठ

किंमत या भू मातेची 


देश सेवा पूर्ण समर्पण 

स्वाभिमानाचा पेटता दिवा

गुलामीची तोडून जंजीर

खुली मिळाली स्वछंद हवा


स्वातंत्र्याचा ध्वज हाती

प्रजेच्या अधिकाराचा

अंधारातून प्रकाशाकडे

तो प्रहर नवीन सूर्याचा


अधिकाराचा ताज

तो दिवस हर्ष उल्हासाचा

न्याय पूर्ण रुपेन प्रजेला

जल्लोष भारत मातेचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational