STORYMIRROR

Sunjay Dobade

Tragedy

4  

Sunjay Dobade

Tragedy

जखम

जखम

1 min
16.3K




युगानंतर भेटलीस तू आणि

मनाच्या जखमा पुन्हा ओल्या झाल्या.

आठवतं अजूनही अंधुकसं

तुझं ते चोरून बघणं,

आणि लाजून हसणं

जागवलीस मनात अगणित स्वप्ने


तूच लावलास एक दिवा माझं घर उजळावं म्हणून;

तूच लावलास एक दिवा माझं घर जळावं म्हणून.

लवंडून गेलीस दिवा आणि

राख झाली माझ्या स्वप्नांची.

घर वाचवलं माझं पण

मी मात्र जळत राहिलो.

काळाच्या औषधानं खपली धरली होती मनावर


पण,

युगानंतर भेटलीस तू आणि

मनाच्या जखमा पुन्हा ओल्या झाल्या...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy