STORYMIRROR

Sayli Kamble

Inspirational

4  

Sayli Kamble

Inspirational

जिंकूनही उरलो एकाकी

जिंकूनही उरलो एकाकी

1 min
289

मांडला खेळ बुद्धीबळाचा, काळ्या नी पांढऱ्या चौकटींचा

लवकरच सुरू होणार होता खेळ हा चुरशीचा


मी आणि प्रतिस्पर्धी दोघेही आता तयार

माझ्याकडे रंग पांढरा म्हणून प्रथम मी झालो स्वार


हळूच मग मी माझे पहिले प्यादे पुढे सरसावले

एक एकच पाऊल टाकत पण परत मागे न परतण्याचे त्याने ठरवले


त्यानंतर हत्तीच काय पण घोडे आणि ऊंटही धावून आले

कधी शत्रूचे मी मारले, तर कधी माझेही काही धारातिर्थी पडले


आता वजीरही उतरला मैदानात, त्याची सर्व दिशांना धाव

कसलीच अट नसे त्याच्या कर्तुत्वाला फक्त राखावे त्याने राजाचे नाव


चालत राहिला खेळ आणि सुऱूच होती चढाओढी

येणारी वेळच ठरवेल कोण करेल कोणावर कुरघोडी


शेवटी खेळच तो, कोणी जिंकणार तर कोणी हरणार

पण सर्व गमावून जिंकलेल्या राजाला आनंद किती काळ पुरणार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational