STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Inspirational

2  

Rohit Khamkar

Tragedy Inspirational

जिंकायच होतं

जिंकायच होतं

1 min
516

वेळ जात होती तस वय वाढत होतं,

समज येत होती तसं मन मरत होतं.

स्वतः सोडून सगळ्यांसाठी झटत होतं,

काय सांगू हाच आनंद पटत नव्हत.


भूक सोडून सगळ्या बाबतीत पोट भरत होतं, सगळं सरल तरी समाधान तेवढ होतं. अबोलपणाचं भूत वाढतच होतं,

ताठ मानेन मुंडकं कधीच टाकल होतं.


जाणवत होत की शर्यतीत टिकायच होतं, सगळ्यांसाठी का होईना उठायच होतं. पुन्हा एकदा जोमाने पळायच होतं, शेवटी जिंकायच म्हणजे जिंकायचच होतं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy