STORYMIRROR

mbpk creation

Abstract

4  

mbpk creation

Abstract

जीवनगाणे...

जीवनगाणे...

1 min
347

भाव जे तुझ्या मनातले

सारे मनातच राहू दे

सांगायचे जे काही असे

डोळ्यात मला ते पाहू दे


वेचण्या कण ते मनाचे

गुंफली स्वप्ने मनात मी

वेदनेच्या गावास माझ्या

आता पावलांना जाऊ दे


सुखाची झोपडीच माझी

महालाचा मोह कुठला?

मिळतो विसावा शांतता

हृदयात तुझ्या राहू दे


लागती चटके जिव्हारी

आज गुलाबी थंडीत या

ऊब मिळण्या सोबतीने

त्या स्पर्श उन्हात न्हाऊ दे


सुरात सूर मिसळत

दे ना अविरत साथ तू

हात हाती देऊनी माझ्या

जीवनगाणे गाऊ देत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract