साथ सर्वांची.
साथ सर्वांची.
पाय पसरत भारतात
आला आता कोरोना
हरवु या साथीला
तयार आहे सारे ना?
गर्दीत जाणे टाळु
स्वच्छ धुऊत हात
काळजी घेऊ सारे
पसरेल ना ही साथ
शिंकतांना-खोकताना धरु
नाका-तोंडाशी रुमाल
थोडीशी ही काळजी
करेल भलती कमाल
घेऊ सकस आहार
रोज पुरेशी झोप
रोगप्रतिकार वाढेल
होणार नाही रोग
वेळ घालवु कुटुंबात
गप्पा मारु मस्त
ताण घेण टाळत
सारे राहु स्वस्थ
रोग हा साथीचा
हवी सर्वाची साथ
करु आपण सहज
या कोरोनावर मात
पुढील युध्द विषाणुचं
गरजेच एक होण
होईल शक्य एकिनेच
खरे मात देण.