माय!
माय!
उन-पावसात रोज
राबती तिचे हात
सुख-दुःखात कुटूंबाच्या
मायेची माझ्या साथ
सडा सारवण करी
रोज थापते भाकरी
आवरुण घर सारं
जाते शेतात शिवारी
गोड-धोडाचं त्या मोह
नसे उत्सव सणात
बाळा शाळेत जायजो
सदा सांगे ती कानात
लेकराच्या सुखासाठी
तिनं मारलं पोटाला
दावली तीन वाट
कधी धरत बोटाला
ना केला डामडौल
ना नविन कापड
चिंध्यावर दिस काटे
अर्ध रायत उघड
सांज मावळाच्यावेळी
वाट दारावर पाहे
कवा खेळ संपायचा
ध्यान पाखरात राहे
भरवायची हातानं
ती एक-एक घास
दिसभर दमुन ही
ना जाणु दिली त्रास
मिळे कुशितच सदा
आम्हा थोरा शिकवण
घडवत माती गोळा
झिजली ती हर क्षण
काय सांगावा शब्दात
माय माऊलीचा गोडवा
वाटे हर जन्म नवा
तिच्या पोटीचं मी घ्यावा!.
