STORYMIRROR

mbpk creation

Others

4  

mbpk creation

Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
467

जीवनात ती अनमोलशी

सदैव सोबत राहे

माता, भगिनी, सखी-संगिनी

अनेकरूपी ती आहे


माय होत ती सांभाळी

भगिनी म्हणुनी ती ओवाळी

सखी बनुनी सोबतीला

हसे, खेळे अन् गाये

माता, भगिनी..........


संगिनी ती शतजन्माची

सुख-दुःखाची हर कार्याची

बहरवत संसारवेल ती

प्रवाहासारखी वाहे

माता, भगिनी..........


दोन घरांची नावे उजळी

परके घरही आपले करी

खांद्याला लावुनी खांदा

चटणी-भाकर खाये

माता, भगिनी.............


उणे तिच्याविण जीवन सारे

महान कार्य तिचे साजरे

करा आदर स्री शक्ती

हर हाल सुखाने सहे

माता, भगिनी, सखी-संगिनी

अनेकरूपी ती आहे


Rate this content
Log in