लाॅकडाऊन
लाॅकडाऊन
1 min
11.5K
लाॅकडाऊन मंदिर - मस्जिद
लाॅकडाऊन झाल्यात शाळा
ईश्वर - अल्लाह बंदिस्त
डाॅक्टर, पोलीस सारे गोळा
संकट मोठा कोरोनाचा
पक्षी घरट्यात लपले
फडफडणारे चिवचिवणारे
काळजी करत दमले
पुजा - अर्चना विसरत
हात धुणे सुरु
स्वच्छता हेच देव
जप लागले करु
चार भिंतीच्या आतच
सुरु झालेत खेळ
दुरावलेल्या नात्यांना
मिळु लागला वेळ
ओस पडले रस्ते
ओस बाग मैदान
गर्दी, खेळ, फिरणे
असायचे जेथे छान
चिंता करणे सोडत
संयम-नियम पाळावे
पसरेल साथ ज्याने
तेच करणे टाळावे
लाॅकडाऊन या लढ्याचा
विजय निश्चित होईल
मोकळ्या श्वासाचा सुर्य
परत एकदा येईल.
