...क्षण ते
...क्षण ते
1 min
395
जगण्यास आज येथे
आधार त्या क्षणांचे
भान सवेत विसरे
हजार वेदनांचे
हवेत येथे कोणा?
रमणे सदा मनाचे
बस छेडल्या जावे
तार या मनाचे
आशीष नकोच आता
नको जडी बुटी ती
नसणे तुझेच झाले
आजार या मनाचे
चंद्रास लाजवावे
झर्यास हासवावे
फुलास बहरवावे
प्रकार या मनाचे
आता ही बोलके ते
क्षण आठवताना
राहिली ना काही
तक्रार या मनाची
