पाऊस हवासा...
पाऊस हवासा...


ढग बागडू लागले
नभी सारं आनंदानं
सरीसवे एका एका
कसे बहरले रान
पक्षी घरट्यात आज
ऊब मायेची घ्यायला
चोचीतले दाणा-पाणी
असे पिल्लांना खायला
गाई गुरे माळावर
चरे शिवारात ढोरं
धारेसव पावसाच्या
झाडी आसर्याला जोर
डोंगरास फुटे झरे
झाले पाषाण दुधाळ
काळ्या-निळ्या मेघांचा
अभिषेकाचा आभाळ
तसा मला तो हवा
अंतर्मनी भिजायला
मनी पसरली आग
लागे खरी विझवायला