STORYMIRROR

mbpk creation

Others

4  

mbpk creation

Others

जुगार

जुगार

1 min
599

बाप होई रे पेरता

जरी मोकळं आभाळ

लावे जुगार तो कसा

येई कोठुन हे बळ?


झिजवत पायर्‍यांना

उभ केलं त्यान रिन

ना घेतले कापडं

केलं नाही त्यान सण!


कष्ट वेचतच सारं

घाम शेतामंदी गाळी

केविलवाण्या नजरेनं

रोज पायतो आभाळी


काळ्या आईची ओटी

तो या आशेवर भरी

मिळो सुखाची पिल्लांना

दोन वेळची भाकरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन