STORYMIRROR

mbpk creation

Tragedy

3  

mbpk creation

Tragedy

तू अन् पाऊस.....

तू अन् पाऊस.....

1 min
11.6K

ढग सरकू लागले

झोंबे सोसाट्‍याचा वारा

थेंब-थेंब त्‍या सरीचा

घाव करे तो गहिरा


जुन्‍या जखमा किती त्‍या?

आज नव्‍याने वाढल्‍या

जुन्‍या आठवणी सार्‍या

त्‍याने उघड्‍या पाडल्‍या


नको छळू रे तू असा!

कधी येत अनवाणी

चिंब करशी मनाला

डोळ्‍यामधी आणि पाणी


होता हातामधी हात

हवा-हवासा तू वाटे

ढग पावसाळी आज

बोचतात मनी काटे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy