STORYMIRROR

mbpk creation

Tragedy Inspirational

4  

mbpk creation

Tragedy Inspirational

बाप

बाप

1 min
97

बाप झिजला रं माझा

बहरायला शिवार

केलं सिंचन घामाचं

सोनं पिकाया वावर


नाही थांबला तो कधी

जरी शिणला थकला

आसमानी संकटाला 

कसा नाही तो झुकला 


मिळालंच नाही कधी

त्याला कष्टाचं त्या मोल

फिरवली नाही त्यानं

काळ्या आईला पावलं 


दोन घासासाठी राबे 

नवं दुसरं असं काही

रोज आभाळी पायत

याच चिंतेत तो राही 


कवा व्हायची रं दूर

माया बापाची काळजी 

कवा मिळेल सुखाची 

दोनं वेळं पोळी-भाजी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy