लोकशिक्षिका-बहिणाबाई
लोकशिक्षिका-बहिणाबाई


नसे कसली पदवी
दिली लोक शिकवण
अंधश्रद्धा-प्रबोधन
केल तिनं हर क्षण
उभा देह माऊलीचा
जात्यावर ओवी करे
अज्ञानात समाजाच्या
गिरवलीतं अक्षरे
साध्या सरळ शब्दात
तिनं दिलं मोठा धडा
कर्मावर सारं काही
नको ज्योतीषी आकडा
माय ममता महती
असे जगात या कशी?
कसे सांभाळी सुगरण
एका आपल्या पिल्लाशी
ठेवा मनावर ताबा
करा योग्य ते विचार
लोकशिक्षिका बहिणा
गेली हांगुणी हे खरं