STORYMIRROR

Manisha Wandhare

Inspirational

4  

Manisha Wandhare

Inspirational

जीवनाची कविता

जीवनाची कविता

1 min
407

अक्षरांचे शब्दं होते भावनेला स्पर्शुन जाते,

वाचतांना या फुलांना डोळ्यांतून मनस्पर्श हसते ...


अलगद सांडतात मग पापण्यातून शब्दं ,

गालावर ओघळतांना खळीतून हळूच मनात विरते...


चांदण्याचा चुरा करून पाचूच्या वनात शिंपते ,

क्षितीजापलीकडे रंगवते स्वतःला सांजेच्या कुशीत शिरते ...


मलाच आठवायचे होते का? तुला का? दूसरे कुणी ,

क्षणभर भांबावते थोडेशी हसून गालातच हसते ....


शब्द शब्द दाटतात ऊरी गर्दि किती भावनांची,

थांबत नाही ना पैलतीरी ऐलतीरावरच भरगच्च दाटते...


जीवनाची कविता ही अशीच अपूर्णात पूर्णत्व भरते,

लिहीतां लिहीतां राहते काही नकळत लिहील्या जाते...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational