STORYMIRROR

Manisha Wandhare

Inspirational

3  

Manisha Wandhare

Inspirational

जीवनाचा हा प्रवास

जीवनाचा हा प्रवास

1 min
127

दे झुगारून बंधनाना ,

तोड पाश ते मळकटलेले ,

हव्यास नको आगतिकतेचा ,

लाथाळून वाट पाषाणाची ,

घे भरारी उंच आसमंती यशाची ,

जीवनाचा हा प्रवास नसेल सदैव सोबती ,

जगून घे शतके याच जीवनाशी ,

कास धर तु यशाची समृद्धीची ,

हो यशस्वी ,तु हो यशस्वी ...

तोडून दे ती साखळी ,

जी पायात जखळली ,

कीरंणाना साठव डोळ्यात ,

उजाळून टाक सारा अंधकार,

काळोखही कापेल थरथर धराया तुझी वाट,

काट्यांनाही प्रश्न पडेल बोचावे किती पायात,

हसणारे वारे ही वाहतील तुझ्या ओघात,

फेर धरेल दिशा , दुमदुमतील आतिष,

नाव तुझे घेऊन जगात,

घे भरारी उंच आसमंती यशाची ,

जीवनाचा हा प्रवास नसेल सदैव सोबती ,

जगुन घे शतके याच जीवनाशी ,

कास धर तु यशाची समृद्धीची ,

हो यशस्वी ,तु हो यशस्वी ...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational