STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

जीवन

जीवन

1 min
236

कठीण सोपे जीवनात

असे काही नसते

कठीण प्रश्नालाही कधी

सोपे उत्तर असते


कुठला प्रश्न कठीण

अन् कुठला सोपा

व्यक्तीपरत्वे ठरते

सोडवायचा कसा


सकारात्मक चतुर

कठीण प्रश्न सोडवी

अगदी चुटकीसरशी

उत्तर शोधून काढी


नकारात्मक व्यक्तीला

साधा प्रश्नही कठीण

बाऊ करती प्रश्नाचा

म्हणती महाकठीण


जीवनात नित्य असे

अनुभव हाच गुरु

कठीण प्रसंगी सारे 

हात तयाचा धरू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract