STORYMIRROR

Supriya Devkar

Abstract

2  

Supriya Devkar

Abstract

जीवन

जीवन

1 min
92

                आखीव रेखीव बांधेसूद श्री लहानपणापासूनच दिसायला खूप सुरेख होता. त्याची नाजूक कांती, चमकदार त्वचा कोणालाही भूरळ घालत असे. श्रीची आई वडील मात्र नेहमी काळजीत वाटत असत. ते अनेक पुजा घरात घालत असत कुठले कुठले बाबा त्यांच्या घरी येत असत. पण त्याची वाच्यता घराबाहेर बिल्कुल होत नसे. 

     एक दिवस श्री घरातून नाहिसा झाला त्याला रात्री कोणी बायका घेऊन गेल्या होत्या. आता तो कधीच पुन्हा दिसणार नव्हता. श्री ची आई पार तुटून गेेेली होती. वडीलांचच धाक असल्याने ती काहीच करू शकत नव्हती.

   तिच्या  काळजाचा तुकडा तिच्याजवळ नव्हता तिने मान्य केेेल होत आपला मुलगा एक किन्नर आहे. किन्नर समाजात त्याला आता श्रीजा नावाने ओळखले जात होते. श्रीजा वेगवेेेेगळ्या कार्यक्रमात नाचायला जात असे.

त्याच आयुष्य पूर्णपणे बदलून गेल होत. अशातच एक दिवस श्रीजाला एका  कार्यक्रमात किशन तिला भेटला त्या दोघांत चांगली मैैत्री झाली. खाणंपिणं, दोघांच सोबत फिरणं वाढलं. दोघांना एकमेकांशिवाय वेेेळ जात नव्हता

      त्यातच किशनने एक दिवस त्याच प्रेम व्यक्त केेेल त्यावर श्रीजाला काय बोलाव कळेना. किशन तिला घरी घेऊन गेला . आपल्या लहान बहिणीला भेेेेटवल्यावर त्याने तिथेच लग्नाची मागणी घातली. श्रीजाने ही मग आपल्या माईला विचारल.तिने तर साफ नकारच दिला.पण दोघांच प्रेम जिंकल.

दोघांनी समाजाचा रोष पत्करून लग्न केल. आज पाचव्या वर्षांत पदार्पण करीत असताना श्रीजा आणि किशनला हसत खेळत जगताना पाहून खूप आनंद होतोय. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract