जीवन प्रवास
जीवन प्रवास
सुखाचे दुःखाचे
ऊन पावसाचे
एका पेक्षा एक
क्षण जीवनाचे
लटकी भांडणे
लटके रुसणे
आनंदात कधी
प्रसन्न हसणे
अहम भावना
कधी प्रसवते
रेशीम बंधाची
वीण उसवते
शब्द अचानक
हत्यार बनते
हृदय कुणाचे
जखमी करते
कधीच कुणाची
नको उणी दुणी
दुःखीकष्टी कधी
होऊ नये कुणी
असो प्रसन्नता
जीवनात खास
सुखात चालावा
जीवन प्रवास