STORYMIRROR

Raghu Deshpande

Inspirational

3  

Raghu Deshpande

Inspirational

जीवन पद्धती

जीवन पद्धती

1 min
46


साधे सोपे जीवन माझे

किमान माझ्या गरजा

किती कमावले किती राखले

मी न मारल्या बेरजा....! 


झाले गेले विसरून गेलो

मनी न ठेवली आढी

प्रेम राखले, प्रेम वाटले

प्रेमरंगाची गुढी....!


व्यवहाराच्या बाजारात

कमी अधिक होते जातें

Advertisement

ter">घासाघीस कुठे करतां

कोण काय सोबत नेतें....?


अनेक आले आणिक गेले

कोण ठेवितो ध्यानी?

जगरहाटी असे बाबा

जीवन लाविजें कल्याणी...


दोन दिसाची रंगत संगत

काही न आपुल्या हाती

आडवे तिडवे बोलून तुम्ही

नका तोडू हो नाती....

नका तोडू हो नाती.....!!


Rate this content
Log in

More marathi poem from Raghu Deshpande

Similar marathi poem from Inspirational