STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
177

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 चालून ,चालून रस्ता संपला

 मार्ग तरी मज गवसला नाही,

 नव्या वाटांना शोधीत चालेन

 कारण मी थकणार नाही....


 शरीराचे नाना सोहळे असता

 मन तरी प्रफुल्लित सदा राही,

 क्षितीज दूरचे कवेत घेईन

  कारण मी थकणार नाही...


 किती वादळे आली, गेली

 धैर्याला माझ्या दाद नाही,

 श्वासांत पुन्हा भरली उमेद

 तरीही मी थकणार नाही..‌..


 प्रारब्धे मिळाला मनुष्य जन्म

 उपकार कधीच विसरणार नाही,

 लाख वादळे अवतीभवती

 तरीही मी थकणार नाही...

🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational