जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष
किती चटके बसले
परिस्थितीचे बेशर्त,
मन होई उदासीन
जीवन एक संघर्ष.......
आयुष्याच्या त्या जखमा
खोलवर देती दर्द,
खुणा आजही ओल्याच
जीवन एक संघर्ष.......
माय-बापाच्या कष्टाची
ठेवुनी जाणीव आर्त,
मोती घामाचे पिकले
जीवन एक संघर्ष.......
किती-किती आठवती
मज जीवघेणे कष्ट,
त्यांच्या कष्टाची जाणीव
जीवन एक संघर्ष......
नकळत पाणावती
हृदयाची हाक ती सार्थ,
बदलले क्षण ते सारे
जीवन एक संघर्ष......
