STORYMIRROR

Swarup Sawant

Inspirational

3  

Swarup Sawant

Inspirational

जीवन एक प्रवास

जीवन एक प्रवास

1 min
27.7K


जीवन एक प्रवास

आनंदाचा हो आभास

सुख येईल हा विश्वास

निरंतर अंतरी॥१॥


फुका नात्यांच्या मोहास

पुढे पुढे धावण्यास

बेहाल करी श्वासास

निरंतर अहंकार ॥२॥


जातिभेद हो फुकास

उचनीच अविश्वास

जीव लावी हा दाव्यास

निरंतर कटुता ॥३॥


अर्पा जीवन ईशास

नित् प्रार्थू विनयास

सोडू आता सारे पाश

निरंतर मुक्तता॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational