जीर्णोद्धार
जीर्णोद्धार
आभाळापलीकडे
कोंडलेला श्वास
आभासी सुखाच्या झरोक्यातून
झिरपत झिरपत
दिशादिशांतून प्रवास करत
सावलीची सोबत करत
स्थित्यंतराची वावटळ झेलत आणि
त्याच वावटळींना काळजात रिचवत
विखुरलेल्या पावसाला शांत करत
तो श्वास कधीतरी माझ्याजवळ आला...
अन् मी...
आपल्याच वास्तवांच्या भिंती,
सुखदुःखांची वर्तुळे कोरत कोरत
आयुष्य सांधत होतो
आला क्षण कधी जगत होतो
तर कधी जपत होतो
त्या श्वासाला स्वतःतच झिरपवत होतो
त्या कोंडलेल्या श्वासांचा जीर्णोद्धार करत होतो
या आभाळाच्या अलीकडे
