जीभ
जीभ
पूर्णविराम ऐकायच्या आधी, चरचरीत जीभ उचलली.
आपल्यानाच समजण्यासाठी, मनात एक आढी बसवली.
पेरले होते विष मनात, तसे ओठात कपटच उगवले.
माणसे अशी तोडत गेलो, की गर्दीमध्ये हे शरीर एकटेच राहिले.
आपुलकीचा विचार कधीच केला नाही, फक्त पाण्यात पहात राहिलो.
सगळ्यांना उत्तर देण्याच्या नादात, सरसर उलटे बोलत गेलो.
हे कधी आणी कस सुरू झाल, काही कळलंच नाही.
सगळ सुटत गेल समोर, आता बघतोय शिल्लक राहील का काही.
जिवंत असून सुद्धा, आत्मा कधीच मेला.
कधी कुटल्या काळी या जीभेणे, फक्त द्वेषच केला.
