STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Comedy Drama

3  

Sumit Sandeep Bari

Comedy Drama

झुंबर घेऊन द्या...

झुंबर घेऊन द्या...

1 min
605

झुंबर घेऊन द्या हो, मला झुंबर घेऊन द्या,

झुंबर घेऊन देऊ तर पैसे कुठून देऊ?


गाडी विकून द्या पण मला झुंबर घेऊन द्या,

गाडी विकून देऊ तर चारा कसकाय आणू?


चारा विकून द्या पण झुंबर घेऊन द्या,

चारा विकून देऊ तर बैल काय खातील?


बैल विकून टाका पण झुंबर घेऊन द्या,

बैल विकून टाकू तर शेतात कसे जाऊ?


शेत विकून टाका पण झुंबर घेऊन द्या,

शेत विकून देऊ तर आपण काय खाऊ?


तुम्ही भूके राहा पण झुंबर घेऊन द्या,

मी भुकेला राहू तर मी मरून जाऊ?


तुम्ही मरून जा मी दुसरा करून घेऊ,

चल ग माझी राणी मी तुला झुंबर घेऊन देऊ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy