STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

4  

Manisha Awekar

Inspirational

झालो ...सज्जन ...सज्जन

झालो ...सज्जन ...सज्जन

1 min
470

आम्ही चुकोनी असेच

कसे नशाबाज झालो

संसाराचे चक्र कसे

हरवून की बसलो   (१)


हालहाल नि अपेष्टा

किती जीवाची काहिली

तुच्छ नजरेने आम्हां

लाखोलीच की वाहिली (२) 


केंद्रामध्ये गेलो जेव्हा

आम्ही व्यसनमुक्तीच्या

मुक्त महिन्यात झालो

आम्हां वाटा दावियल्या (३)


आता पूर्वीसारखेच

मानमरातब घेतो

समुदाय सज्जनांचा

आम्ही सम्राटच होतो (४)


काळाकुट्ट अंधाराचा

जणू पटल विरला

धडा शिकलो जीवनी

तम निशेचा सरला (५)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational