झाड
झाड
झाडाचं मन केवढ मोठं
आपणास देते सावली
त्रास न देता कुणाला
धन्य, अशी ती माऊली
झाडाच्या फांद्या
लांब मोठमोठ्या
मुलांच्या ते कामी पडे
असा तो झोपाळया
झाडाखाली बैसूनी
आराम करी कृषिकं
त्याच्या घामाच्या सुगंधाने
तृप्त होई पादप
अशी ती माऊली
असे ते पादप
दुसऱ्यांना देई आनंद
करुनी सुखद