" चिमुकली पाहुणी "
" चिमुकली पाहुणी "
1 min
122
चिमुकली पाहुणी, येती घरा
वाटे आनंद, याचा सर्वांना
गोंडस असे बाळ माझे
सर्वांना पाहून, बाळ हासे
नयनमाथ्याला लावूनी काजळ
उतरविली तिची, आईने नजर
चिमुकली पाहुणीचे, लहानसे हात पाय
दिसतेस जशी, काही दुधातली साय
चिमुकली पाहुणी, जशी गुलाबाची कळी
खुलुन दिसते हसताना, तिच्या गालावरची खळी
चिमुकली पाहुणी, जशी काचेची बाहुली
नशीब अमुचे, पडती घरात लक्ष्मीची पावली