आई तुझ्या चरणी
आई तुझ्या चरणी


मिळाला जन्म मनुष्याचा
घेऊनी जन्म तुझ्या उदरी
तुझ्या ह्या महान कार्याने
बसलीस तू माझ्या अंतकरणी
नतमस्तक! तुला हे माते
नतमस्तक! तुझ्या चरणी
सोसुनी धनी चे प्रत्येक घाव
सोशिला संसाराचा काळा बाजार
तुझ्या ह्या महान कार्याने
बसलीस तू माझ्या अंतकरणी
नतमस्तक! तुला हे माते
&nb
sp; नतमस्तक! तुझ्या चरणी
सुखाची केली न पर्वा
थांबली आम्हा भावंडांसाठी
तुझ्या ह्या महान कार्याने
बसलीस तू माझ्या अंतकरणी
नतमस्तक! तुला हे माते
नतमस्तक! तुझ्या चरणी
फेडिला तुझ्या कर्माचा भाग
दावुनी तुला शुद्ध धर्माचा मार्ग
नतमस्तक! तुला हे माते
नतमस्तक! तुझ्या चरणी