जगून तर बघ
जगून तर बघ
जगून तर बघ
जीवन सुंदर आहे,
प्रयत्न करुन तर बघ
देण्यासारखं तुझ्याकडे खूप आहे.
प्रेम देऊन तर बघ
ते घेण्यासाठी इच्छुक खूप आहेत,
लळा लावून तर बघ
जवळ येणारे खूप आहेत.
दुःख वाटून तर बघ
मदतीला धावणारे खूप आहेत,
सारं काही विसरून तर बघ
तुझ्या स्वागताला सारेच आहेत.
दुसऱ्याला आनंद देवून तर बघ
आपलंच मन प्रसन्न होणार आहे.
गेलेल्यांना विसरून तर बघ
नक्कीच हे जीवन सुंदर आहे.
