जगण्यासाठी
जगण्यासाठी
जगण्यासाठी मला
तुझा आधार हवा होता
मला न सांगता गेलीस
हुंदका माझा तेवढा
फक्त शिल्लक ठेऊन गेलीस
समजावता तुला
मला आला नाही
मी तर तुझा श्वास होतो
हृदयातले ठोके तेवढे मात्र चालू होते
ते तुझाच नाद करत होते
अधुरी माझी कहाणी सोडून
मला अशी अधांतरी सोडून गेलीस
आधार नाही दिला मला
फक्त हुंदका माझा शिल्लक ठेवून गेलीस
