जगन्नियंता
जगन्नियंता
मन जरी माझं असलं,विचार तूच जागवतोस
तृषार्त आत्म्यांची जशी तहान भागवतोस
संकटांच्या फुफाट्यात लोटून देतोस भेंडोळायला,
कणखर निपजतो त्यातून वा तुझेच हात सांभाळायला
आमच्या हातून घडवून घेशी विलोभनीय कलाकारी,
पण सृष्टीच्या निर्मात्याशी आमची कशी बरोबरी?
सा-यांनाच देतोस तू जगण्याची समसंधी,
उद्योगी करतात सोनं,नी आळशी नशिबाशी मिंधी!
