जगजीवन हे
जगजीवन हे
मुलीला "स्त्री" म्हणून कसा
जगायचा नेहमी शिकवता
पण मुलाला "पुरुष" बनून कसा
जगायचं कधीतरी शिकवाल का
मुलीने कुण्या मुलांसोबत बोलले
तर चौकशीची पिंजऱ्यात उभा कराल
पण पोरगा टपरीवर काय काय गोष्टी
करतो कधी तरी विचाराल का
मुलगी महान वगैरे वगैरे
नाही सांगितलं तर चाललं न
पण ती तुझ्या आईसारखी एक
व्यक्ती ही समजूत कधीतरी द्याल का
आणी तिच्यातले पाहायचं
झालचं तर स्वभाव, सौंदर्य हे
पाहायचं असते
"उपभोग्य वस्तू" नसते ती कुण्या दुकानात
विकायला ठेवलेली हे ज्ञान त्याला द्याल का
घरी सून बनून आलेली मुलगी थोडी
गडबडली की चालू होते ओरडणे तिच्यावर
पण ती पण शेवटी "मुलगी "म्हणुन सर्व
विसरुन तिचे आई-बाप तुम्ही व्हाल का
नेहमी शिकवता मुलींनी
कसे वागायला हवे अनोळखी
कुण्या मुलासोबत
पण मुलाने वागावे कसे कुण्या मुलीसोबत
याचे धडे कधीतरी अभ्यासक्रमात द्याल का
