Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogesh Nikam

Romance Others

3  

Yogesh Nikam

Romance Others

जगायचयं सखे मला

जगायचयं सखे मला

1 min
273


जगायचयं सखे मला

तुझ्या येण्याने सुचलेल्या त्या कवितेत

हदयस्पर्शी वाटणार्या तुझ्या त्या बोलण्यात

मितभाषी प्रेमाच्या त्या भावनेत...!


जगायचयं सखे मला

मला न सांगतां प्रेमात पडलेल्या त्या मनांत

वार्याने उडणार्या तुझ्या त्या बटात

माझ्या हातात हात घालून रमलेल्या त्या वेळेत...!


जगायचयं सखे मला

मी जवळ आल्यावर धडधडणार्या हृदयाच्या स्पंदनात

मला बघून उंचावणार्या तुझ्या त्या भुवयात

हळूच लाजून झुकणार्या तुझ्या त्या नजरेत..!


जगायचयं सखे मला

जीव ओवाळून टाकणार्या तुझ्या त्या स्वभावात

तुझ्यापासुन सुरु आणि संपणार्या आयुष्याच्या वाटेत

सावली माझी बनून मला दिलेल्या त्या साथीत..!


जगायचयं सखे मला

रागवल्यानंतर अबोल तुझ्या त्या रुसव्यात

तुला मनवण्यासाठी गायलेल्या त्या गाण्यात

तु जवळ नसल्यास सतावणार्या आठवणीत


जगायचयं सखे मला

तुझ्यासोबत रंगवलेल्या त्या स्वप्नात

हसताना गालावर पडलेल्या त्या खळीत

जन्मोजन्मी साथ देणार्या तुझ्या त्या वचनात....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance