जबरदस्ती
जबरदस्ती
काय म्हणुनी केला, विनयभंग माझा.
संपवलस आयुष्य माझ, अधिकार काय तुझा??
शरीराची आकर्षता, तू राक्षसासारखी लुटलीस.
दुनियेच अजब जिण, तू खूप नंतर पेटलीस.
जाळोनी लाखो मेणबत्त्या, मी परत येणार नाही.
समजवा माझ्या परिवाराला, कारण ते घरी जाणार नाही.
सुटले मी कधीच, प्रतिकार माझा खचला.
कायद्याच्या खुंटी मागे, कचरा किती साचला.
दुखः नाही भंग झाला, माझा जिव सुद्धा गेला.
काय करूनिया जाग येईल, जिथे बाप माझा मेला.
अपराध असो की गुन्हा, पाप तुम्ही केले.
जबरदस्तीने का होईना, तुम्ही आयुष्य माझे नेले.
