जाते (जाते )
जाते (जाते )
जाते फिरे
घरघर
पीठ पडे
भरभर...१!
दळण्याचे
करी काम
दळतांना
राम नाम...२!
पहाटच्या
पारी गाई
दळतांना
ओवी आई...३!
सान मोठ्या
आकारात
जाते असे
ते घरात...४!
दगडाचे
हे साधन
नित्य करी
हो दळण...५!
दोन पाळ्या
वर खाली
मधोमध
पारी लावी...६!
वरच्याला
खुंटा लावू
गरगर
ते फिरवू...७!
व्यायाम हा
कमरेला
बांधा छान
दिसायला...८!
