जात
जात
कुणी या कुणी
त्या जातीत असते
शेवटी जात म्हणजे
काहीच तर नसते
मरताना जातीची
किंमत काही उरते का
अहो, माणूस मरतो
जाती कुठे मरते का
जन्मतःच जात शिक्का
कपाळी प्रत्येकाच्या लागला
पाहता पाहता गाव शहर
देश पण जातिनिहाय दुभागला
कुणी निळा, कुणी भगवा,
कुणी हिरवा, कुणी पांढरा रंग
आपलीच किर्ती सांगण्यात
आज झाले ते बेभान दंग
जातीसाठी जवळच्याच
गळ्यावरुन सुरी फिरवली
मग तर माणसांमधील
माणुसकीच हरवली
