जाणता राजा
जाणता राजा
शिवनेरी किल्ल्यावर शिवराय
जन्मले जिजाऊच्या पोटी ,
शिवराय पेटून उठले
आता लढण्या जनतेसाठी ...||1||
जिजाऊचा लाडका शिवाजी
आता रयतेसाठी लढला ,
शिवराया मुळेच वेड्या
हा सारा महाराष्ट्र घडला ...||2||
हातात घेऊन तलवार
घोड्यावर झाला स्वार ,
जनतेसाठी शिवरायांनी
केला आपल्या शत्रूंवर वार ...||3||
जिजाऊ मुळेच या महाराष्ट्राला
जाणता राजा मिळाला ,
स्वराज्याचा खरा अर्थ आम्हाला
शिवराय मुळेच कळला ... ||4||
जिजाऊंचे थोर संस्कार
होते लाडक्या शिवबावर ,
तसेच संस्कार लादले
शिवरायांनी आपल्या मावळ्यांवर ... ||5||
