STORYMIRROR

Pranjali Kalbende

Abstract

3  

Pranjali Kalbende

Abstract

जांभळाई

जांभळाई

1 min
203

जांभळाई गर्द दाट

डोंगराच्या पायथ्याशी

घेत उराशी सर्वांना

माया उच्चभ्रू शीराशी........१


सांजवेळी क्षितिजाला

लाली केशरी रंगाची

मनी अध्यात्म काजळी

दाटीवाटी भावनांची........२


गुढ रहस्य आगळे

कातरवेळेचे खरे

आलिंगन रंगासंगी

निसर्गाचे भाव झरे.........३


भानू दडे हर्षभरे

दिवसाला संगी घेत

गुजगोष्टी काळजात

उल्हासाचे गीत नेत.........४


वसुंधरी रंगछटा

पानाफुलां हर्ष येई

मावळत्या दिनकरा

निरोपास साथ देई..........५



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract