STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3  

Sanjana Kamat

Inspirational

जागर स्त्री शक्तीचा

जागर स्त्री शक्तीचा

1 min
189

ये गं अंबे,ये ग अंबे माता,

सत्वर धावून कलयुगी आता ।।ध्रु।।


रौद्ररूपातली दुर्गा,तूच चंडिका माता,

किती ऐकावी ही संघर्षाची गाथा.

अग्नीकुंडी जळे सहनशक्तीची समिधा

सत्ययुग,कलयुगी तीच नारीची व्यथा. ।।१।।


घडविला शिवराया जिजाऊ मातेने,

लढे झाशीची राणी होऊन मर्दीणी.

इथेच जन्मली मदर टेरेसा, सिंधूमाई,

लता,पी. टी उषा चमकती विश्वांगणी. ।।२।।


सावित्रीच्या लेकी घेत शिक्षण झेप,

रमाईचे स्वप्न करे साहसी कामगिरी,

तीच इंदिरा अन् अवकाशी कल्पना,

उडू लागली उंच गगनी घेत भरारी. ।।३।।


सद्बुध्दीचा दिव्यप्रकाश उजळून,

नवरात्रीत होतो,जागर स्त्री शक्तीचा.

भष्ट्राचार, बलात्कार दिनरात माजला,

कर संहार लवकर कलयुगी दैत्यांचा.।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational