STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

जागर माणुसकीच्या

जागर माणुसकीच्या

1 min
416

ऐक माणसा आता जाग जरासा

माणूस जीवनाचा नाही भरोसा


कोण आपला कोण पराया

जो तो लागे स्वतः पोट भराया

नाही संकटी कोणी आडोसा

माणूस जीवनाचा नाही भरोसा


चुकणार नाही हा मृत्यू अटळ

चालत नाही तिथं पैसा न बळ

आपलेच कर्म सांगे जो तो आरसा

माणूस जीवनाचा नाही भरोसा


कुठला धर्म आणि कुठल्या जाती

मातीचा हा देह त्याची होते माती

गरीब श्रीमंत सोड बदल फारसा

माणूस जीवनाचा नाही भरोसा


जो तो मिरवतो आपलीच शान

नात्यागोत्याला नाही कुठले भान

छळ कपटाचा आता सोड तमाशा

माणूस जीवनाचा नाही भरोसा


माणुसकीचा रे करू या जागर

जोडुनी मन सारे बनू भवसागर

 एकसंघ राहू एकच आशा

माणूस जीवनाचा नाही भरोसा


दुष्काळ प्रलय महामारी युद्ध

माणूस लढतो माणूसकी विरुद्ध

स्वार्थ सोडुनी घे भरारी आकाशा

माणूस जीवनाचा नाही भरोसा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational