जाग येईल...
जाग येईल...
लाकडांचा मंडप सजवा
त्यावर हे नासके शरीर निजवा
थोपटवा रडा आरडाओरडा करा
कवटाळून हे मन
साथ सोडून धूरावर रडत असेल
आगीच्या चटक्यांनी शरीर होरपळत असेल
हंबरडा फुटेल गळ्यातून कंठ सुटेल
परत यावे याने एकदा हसून पहावे याने
कडू होता यांचा स्वभाव
गोडी मध्ये कळला नाही
अर्ध्यावर सोडून गेला म्हणून
रस्त्यावरून वळला नाही
रेडा येईल यमाचा
चल माझ्याबर दृष्ट माणसा
निरोप घेऊन जगाचा
चार दिवसांच हे जगणं
बारा दिवस सुतकाचे
एवढा वाईट होतो का मी
त्यामुळे देवाला नाही पुजायचे...
