इतकी दूर राहू नकोस
इतकी दूर राहू नकोस
वेदना असह्य होतात आता
इतकी दूर राहू नकोस
झुरत ठेवून मला अशी
मजा तू पाहू नकोस||0||
गुन्हा इतकाच माझा झाला
प्रेम तुझ्यावर केलं मी
परत फिरणं शक्य नाही
तिथे स्वतःला नेलं मी
स्वप्न मला दाखवून तू
अशी मागे जाऊ नकोस
झुरत ठेवून मला अशी
मजा तू पाहू नकोस||1||
व्याप्ती माझ्या प्रेमाची तुला
कळणं जरा अवघड आहे
पेलवू शकणार तू नाही
फीलिंग्स ही अवजड आहे
सोडून दे प्रेमाची भाषा
प्रेमगीत तू गाऊ नकोस
झुरत ठेवून मला अशी
मजा तू पाहू नकोस||2||
खेळ तुला जे वाटत आहे
हृदय आहे ते टॉय नाही
पार्टी मौजमजा नाही ही
करमणुक एन्जॉय नाही
टिंगल उडवून या हृदयाची
भाव असा तू खाऊ नकोस
झुरत ठेवून मला अशी
मजा तू पाहू नकोस||3||
संकेत तुझे ते पाहून वेडे
जीव झाला हा खुळा
आज हृदय नावाचा अवयव
केलास तू क्षणात लुळा
हात धरून इथवर आणून
परतीच्या मार्गी लावू नकोस
झुरत ठेवून मला अशी
मजा तू पाहू नकोस||4||
वेड मला बस तुझंच आहे
तूच जीवनाची आशा
शब्द इथे हजारो मिळतील
तूच प्रेमाची भाषा
प्रीत जागवून मनात माझ्या
दूर तू सरसावू नकोस
झुरत ठेवून मला अशी
मजा तू पाहू नकोस||5||
