इतिहास थोडा शिकलाच पाहिजे...
इतिहास थोडा शिकलाच पाहिजे...
एक एक गड कोसळतोय
इतिहासाच्या नावाखाली
भरपूर पैसा मिळतोय तसा
पण फक्त जातोय घशाखाली
पिकनिक जाते किल्ल्यांवर
इतिहास कुणालाच माहीत नसतो
कोण महाराज कोण मावळे
कुणी कुणाला ओळखत नसतो
सारे गड-किल्ले इतिहासात आहेत
पण पुस्तकच कुणी देत नाही
मोठ्या पुतळ्यांच्या नावावर होणारा
भ्रष्टाचार कुणीच थांबवत नाहीत
भविष्य घडवायचाय उज्वल तर
इतिहास थोडा शिकलाच पाहिजे
जास्त काही नको फक्त
गड-किल्ले जपलेच पाहिजे
